चंदगड-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघाला शिवाजीराव पाटील यांची भेट…

0
70

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भाजप राज्य कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य तथा भाजपा माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील हे चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

त्यांनी गडहिंग्लज तालुक्यांतील सांबरे, भडगांव, किल्ले सामानगड, येणेचवंडी, हलकर्णी, नूल, जरळी, मुत्नाळ, निलजी या विविध ठिकाणी भेटी देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडी-अडचणी समजुन घेतल्या. यामुळे कार्यकर्त्यामध्ये नवसंजीवनी मिळाल्याचे दिसून आले. तसेच त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. शिवाजीराव पाटील यांनी चंदगड विधानसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी अतिशय चांगले मतदान घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवली होती.