शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ‘ए ++’ मानांकन प्राप्त

0
82

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाला A++ मानांकन प्राप्त झाले आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेने आज (बुधवारी) केली. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानचा तुरा खोवला गेला आहे.   

बंगळूरमधील नॅकच्या पिअर टीमने विद्यापीठाचे १५ ते १७ मार्च या कालावधीत मूल्यांकन केले होते. संख्यात्मक आणि विश्लेषण या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या मुल्यांकनांत ७० टक्के संख्यात्मक माहिती व ३० टक्के विश्लेषणात्मक माहिती होती. समितीने याचा अहवाल नॅकला सादर केला. त्यानंतर शिवाजी विद्यापीठास ३.५२ सीजीपीएससह A++ मानांकन मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.   

विद्यापीठातील सर्व घटकांनी दिलेल्या योगदानामुळे मानांकन मिळाले, अशी  भावना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केली आहे. तर  कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे.