छ. शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलने प्रचाराचा नारळ फोडला…

0
106

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू गव्हमेंट बँकेच्या निवडणूकीसाठी शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथे छ. शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलने आपल्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी डॉ. भारतभूषण कांबळे, प्रा. महादेव कागवाडे, प्रा. युवराज ढोबळे, दत्ता सुतार, सतीश मधाळे, कृषी महाविद्यालयाचे सहायक लेखाधिकारी रवींद्र पाटील, रोहिणी शिंदे, उमेदवार अमित अवसरे, मिनाक्षी शिंदे, अनिल सरदेसाई, राजू सावंत, श्रीमती पाटील, शिवाजी फारकटे, अनिल कामटे, प्रकाश महाडेश्वर आदी उपस्थित होते.