चंदगडमध्ये शिवजयंती उत्साहात…

0
126

चंदगड (प्रतिनिधी) : अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज चंदगड नगरपंचायत येथील सभागृह हॉलमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.

छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष प्राची काणेकर यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक शिवानंद हूंबरवाडी, झाकीर नाईक, दिलीप चंदगडकर, अभिजित गुरबे, सचिन नेसरीकर, अॅड. विजय कडूकर, कलीम मदार, नगरसेविका मुमताज मदार, संजीवनी चंदगडकर, माधुरी कुंभार, अनिता परीट, अनुसया दाणी, नेत्रदीपा कांबळे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.