राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे येथे शिवबा प्रतिष्ठान, बिरदेव बॉईज, क्रांती तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सावकार गणपती आदी मंडळांच्या वतीने आज (शुक्रवार) शिवजयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. तसेच लहान मुलांनी प्रस्थापित केलेल्या शिवबा प्रतिष्ठानतर्फे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.