कोल्हापुरात स्वच्छतागृहाच्या भिंतीवर पन्हाळगडाचे चित्र : शिवभक्त संतापले (व्हिडिओ)

0
195

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील दक्षिणद्वाराजवळील महिला स्वच्छतागृहाच्या भिंतीवर पन्हाळगडासह राधानगरी धरणाचे चित्र काढण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला. यामुले शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. यामुळे शिवभक्तांनी त्यावर पांढरा रंग लावून ते चित्र पुसून टाकले.

गडकिल्ल्यांचे चित्र स्वच्छतागृहावर लावण्याचा प्रकार हा शिवभक्तांचा अपमान असून परत असा प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा या वेळी शिवभक्त हर्षल सुर्वे यांनी दिला. या वेळी आदित्य पवार, प्रदीप हांडे, चेतन अष्टेकर, अप्पा रेवडे, शुभम चौगुले, अर्जुन कदम, महेश कोरवी, शरद चौगुले, युवराज हळदीकर, संकेत खोत, कृष्णात जगताप उपस्थित होते.