मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा

0
433

इचलकरंजी  (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पाठोपाठ शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे. येथील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने १३ पैकी १० जागांवर विजय मिळविला आहे. विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जोरदार आतषबाजी केली.