शिवसेनेचे बंड हा भाजपच्या राजकारणाचा अध्याय : नाना पटोले

0
57

नागपूर (प्रातिनिधी) : शिवसेनेचे बंड हा भाजपच्या राजकारणाचा हा एक अध्याय आहे, पैसा आणि केंद्राच्या सत्तेचा गैरवापर होत आहे, असा मार्ग भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे. यात सत्याचाच विजय, ऊन सावली हा निसर्गाचा नियम आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

तसेच महाराष्ट्रात आलेल्या उन्हाचे सावलीत रूपांतर होईल. ही घटना रात्रीची आहे. मुंबईला सगळ्या नेत्यांची बैठक आहे. या सगळ्या गोष्टींची बैठकीत चर्चा केली जाईल. सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्यासाठी बहुमताचा आकडा अजून दूर आहे, निवडणुकीत मतदानाची बंडखोरी झाली आहे. याचे आत्मपरीक्षण केले जाईल. सगळ्या आमदारांशी चर्चा करून या सगळ्या अडचणीतून बाहेर कसे पडता येईल आणि पार्टीची बळकटी कशी करता येईल भूमिका काँग्रेस घेणार आहे.