हुपरी (प्रतिनिधी) : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याच्या विरोधात शिवसेनेने आज (शुक्रवार) येथे हुपरी येथे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. बैलगाडीने मोटार ओढत काढलेल्या निषेध मोर्चाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केले.

आधीच वाढलेली महागाई, त्यात कोरोनाने उद्भवलेले आर्थिक संकटाने नागरिक मेटाकुटीला आलेले असताना  प्रत्येक घटकाला इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. सामान्य माणसाचे जगणे अशक्य झाले असून त्याला सर्वस्वी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याची जाधव यांनी आंदोलनस्थळी केली.

या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, महिपती पाटील, सौ. उषा चौगुले, विनायक विभुते, अमोल देशपांडे, राजेंद्र पाटील, नगरसेवक पिंटू मुधाळे, नगरसेविका सौ. पूनम पाटील, आण्णा जाधव, संताजी देसाई, भरत देसाई, सौ. मीना जाधव, भरत मेथे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.