गारगोटी पोलीस ठाण्यावर शिवसेनेचा मोर्चा…

0
520

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड पोलीस ठाण्यातील भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी भुदरगड शिवसेनेच्या वतीने आज (गुरुवार) गारगोटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अवैध दारू विक्रेत्यांनी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासमोर पोलीस कर्मचारी किती हप्ते घेतात याचा पाढाच वाचला. तसेच पोलीस निरीक्षकांना मागणीचे निवेदन दिले,  

निवेदनात म्हटले आहे की, तांबाळे येथे १० मार्च रोजी भुदरगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने गावठी दारू विक्रेते बाजेल भुतलो यांच्यावर कारवाई करत पैशांची मागणी केली. भुतेलो यांनी पोलिसांनी महिन्याचा ठरवलेला हप्ता पोलीसांचे पंटर असिफ काझी याच्याकडे दिला होता. तरीदेखील माझ्यावर वैयक्तिक कारवाई माझ्यावर करण्यात आल्याचा आरोप भुतेलो यांनी केला. भुदरगड तालुक्यात अवैध धंदे सुरू असूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मग इतरांच्यावर का अन्याय होत आहे. पोलीस पंटर काझी याचे मोबाईल रेकॉर्ड तपासून त्याला  अटक करावी. जे पोलीस कर्मचारी हप्ते घेतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अशी मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, तालुका प्रमुख अविनाश शिंदे यांनी केली.

यावेळी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी संबधित पोलीसांवर कडक कारवाई करण्यासाठी वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येईल. तालुक्यातील संपूर्ण अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही मोरे यांनी दिला.