पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेनेचा ‘मोठा’ निर्णय

0
245

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका लढवणार नाही. परंतु, या निवडणुकीत शिवसेना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत. निवडणूक न लढविण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.