शिरोळमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन…(व्हिडिओ)

0
106

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ येथील तहसील कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने आज (शुक्रवार)  मोर्चा काढण्यात आला. केंद्रशासनाने गेल्या वर्षभरात २१ वेळा इंधन दरवाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरात  घसरण झाली आहे. तरी देखील केंद्रसरकारने इंधन दर कमी केले नाहीत. या विरोधात शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढून नायब तहसीलदार पी.जी. पाटील यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्च्यामध्ये बैलगाडीला वाहन बांधून ते खेचत बुवापन महाराज मठ ते तहसीलदार कार्यालयापर्यंत आणण्यात आले. तसेच गॅसची टॉकी महिलांनी डोक्यावर घेऊन आणि दुचाकी वाहन ढकलत नेऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्रसरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा  देण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी, सर्जराजाची जोडीच सामान्य जनतेला परवडत आहे. या केंद सरकारने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, असे मत व्यक्त केले.

या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, तालुका प्रमुख वैभव उगळे, माजी तालुका प्रमुख सतीश मलमे, जिल्हा महिला संघटिका मंगलताई चव्हाण, महिला आघाडी तालुका संघटीका रेखाताई जाधव, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक धनवडे, राहुल काकडे, विकास सुतार,राजू पाटील, युवराज घोरपडे,पराग पाटील, राजू कदम आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

या आंदोलनात निलेश तवंदकर, सतीश चव्हाण, राजू आवळे, तेजस कुराडे, मंगेश पाटील,माधुरी टाकारे, वैशाली जुगले, आकाताई कोळी, अर्चना भोजने, वैभव गुजरे, अनिल क्षीरसागर, शिवसैनिक उपस्थित होते.