औरंगाबादचे नामांतर केल्याबद्दल शिवसेना,युवासेनेचा कोल्हापुरात जल्लोष…

0
58

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेना आणि युवासेना कोल्हापूर जिल्हा शहर यांच्यावतीने आज मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामांतर केले. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल छ. शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत साखर-पेढ्याचे वाटप शिवसेनेतर्फे करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने, माजी शहर प्रमुख रविकिरण इंगवले, महिला उपजिल्हा महिला अधिकारी स्मिता सावंत,तालुका प्रमुख विनोद खोत,हर्षल सुर्वे, उपशहर प्रमुख दत्ताजी टिपूगडे, कमलाकर जगदाळे, दिपाली शिंदे, रणजित आयरेकर आदी उपस्थित होते.