इचलकरंजी येथे शिवसेना शिवसंपर्क मोहिमेला सुरूवात…

0
32

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी विधानसभा मतदार संघामधील खोतवाडी, तारदाळ, कोरोची, कबनुर, चंदूर गावातून शिवसेना शिवसंपर्क मोहिमेला आज (मंगळवार) सुरवात करण्यात आली. यावेळी प्रत्येक गावांमध्ये शिवसेनेच्या नामफलकाचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेवराव गौड, विधानसभा संपर्कप्रमुख मनीष धामपूरकर, तालुकाप्रमुख आनंद शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.    

यावेळी मुरलीधर जाधव यांनी, या मोहिमेच्या माध्यमातून शिवसेनेने आजवर जनहीताची जी कामे केली ती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. गाव तेथे शिवसेना शाखा आणि घर तेथे शिवसैनिक निर्माण करण्याचे काम पदाधिकाऱ्यांनी करावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात कोणकोणती जनकल्यानाची कामे केली ती जनतेपर्यंत पोहचवा असे आवाहन केले. तर महादेवराव गौड, मनीष धामापुरकर, आनंद शेट्टी यांनी शिवसेना सभासद नोंदणी जास्तीतजास्त करून पक्षाला उभारी देण्याचे काम करावे असे आवाहन केले.

यावेळी महिला आघाडी जिल्हासंघटिका मंगल चव्हाण, युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, दिनकर अनुशे, रवी धनगर, काशीनाथ बावडेकर, अविनाश वासुदेव, भारत पोवार आदी उपस्थित होते.