कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगली कामगिरी करीत आहे.  सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करून हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

यावेळी राजेश क्षीरसागर यांनी, ना. अदित्य ठाकरे यांनी राज्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवरून त्यांच्या अभ्यासू आणि कृतीशील व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. कोरोना काळात अनेक सेवा भावी संस्था काम करत असून त्यांच्या कार्याला बळकटी देणे आपली जबाबदारी आहे. यातूनच केलेल्या आवाहनास दाद देत मेनन बेअरिंग कंपनीचे चेअरमन नितीन मेनन यांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची उपलब्ध करून दिले. त्याचे वितरण सेवाभावी संस्था आणि गरजूंना ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त होत असल्याचे सांगितले.

यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते मोफत ऑक्सिजन सेवा राबविणाऱ्या मणेर मस्जिद ट्रस्टला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. तसेच गांधी मैदान येथील कै.विष्णुपंत इंगवले कोव्हीड सेंटरला १ लाख, दिगंबर जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कोव्हीड सेंटरला ५० हजार आणि व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या संताजी घोरपडे मोफत कोव्हीड सेंटरला ५० हजार अशी मदत करण्यात आली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक राजू हुंबे, मेनन कंपनीचे विकास पाटील, पानपट्टी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, रमेश खाडे, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.