पिंपळगाव (प्रतिनिधी) : राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाचे पडसाद मंगळवारी पिंपळगाव (ता. भुदरगड) येथे उमटले. येथील शिवसेना संपर्क कार्यालयासमोर उपतालुकाप्रमुख अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पोस्टर लावून घोषणाबाजी करत सर्व बंडखोर आमदारांचा निषेध केला.

मंगळवारी सकाळी शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र झाले. येथील शिवसेना संपर्क कार्यालयासमोर  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोठे पोस्टर उभे करण्यात आले आहे. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. अशोकराव पाटील यांनी निषेध सभेचे आयोजन केले असल्याचे सांगितले. गुहाहटी येथे जाऊन बसलेल्या सर्व बंडखोर आमदारांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. सर्व शिवसैनिक पक्ष प्रमुखांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दशरथ तेलवेकर, नारायण शेवाळे यांची भाषणे झाली.

विभागप्रमुख सचिन कातकर, शाखाप्रमुख अंकुश पाटील, मारुती भादवणकर, तुकाराम गुरव, जानू मुगटकर, जोतीराम कांबळे, भिकाजी जाधव, रोहित शिंदे, बाळासाहेब चव्हाण, पिंटू पसारे, एस. आर. कांबळे, सचिन कांबळे, बाजीराव दिवटे, बाबूराव राऊत, साताप्पा केसरकर, किशोर पाटील, आनंदा डवरी, बाजीराव तावडे, सुरेश शेवाळे, अशोक सावंत, राजू मगदूम, अमोल मगदूम, आनंदा डवरी, विष्णू इंगळे, शिवाजी भोसले, धनाजी चव्हाण, अनिल पाटील, सतीश कळसकर, दत्तात्रय मातले उपस्थित होते.