गडहिंग्लजमध्ये शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध

0
447

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बेळगाव महापालिकेचे उपमहापौर प्रकाश शिरोळकर  यांच्या वाहनाच्या मराठी नंबरप्लेटवर काही कानडी लोकांनी काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. तसेच भगव्या ध्वजाची मोडतोड करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ गडहिंग्लज शिवसेनेच्या वतीने दसरा चौकात कर्नाटक सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आज (शनिवार) निषेध व्यक्त करण्यात आला.  

यावेळी शहर प्रमुख अशोक शिंदे, संजय संकपाळ, सुरेश हेब्बाळे, राहुल खोत, मंथन भडगावकर, अवधूत पाटील, सोमनाथ मुतकन्नावर, रमेश कोरवी, वसंत शेटके, मनीष हावळ, संतोष पवार, अवधूत पाटील, आमित कोरी, बजरंग आजगेकर आदीसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.