टोप (प्रतिनिधी) :  केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सांगली फाटा येथील उड्डाणपूलावरील भिंतीवर बेळगावी असा नामफलक लावला होता. खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली सांगलीफाटा येथील बेळगावी नामफलक उतरवून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.  

यावेळी हा फलक खासदार धैर्यशील माने, जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, माजी आ. सुजित मिणचेकर यांनी खाली उतरवला आणि बेळगाव असा उल्लेख असलेला फलक लावण्यात आला. यावेळी कर्नाटक सरकार व कर्नाटकचे उप मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी खासदार माने यांनी महाराष्ट्रात  बेळगावी नाही बेळगावच असा उल्लेख चालणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख सातापा भवान , तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, उपसरपंच सुरेश यादव, हरी पुजारी, मुकूंद नाळे, अशोक कोळसे, शशिकांत जाधव, रवि धुमाळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.