मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत राज्यसभा निवडणुकीत बाद करण्यात आले. याविरोधात आता सुहास कांदे न्यायालयात जाणार आहेत. त्यांनी कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. 

राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यामुळे हा विजय म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यश असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद ठरवल्यामुळे त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुहास कांदे कायदेशीर लढा देणार आहेत, असेही राऊत म्हणाले.