शिवसेना मंत्री संजय राठोड गायब : अजित पवार म्हणाले…

0
95

मुंबई (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण प्रकरणात नाव समोर आलेले शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड गेली ११ दिवस गायब असल्याची टीका करत त्यांना शोधून काढा, असे विरोधी पक्ष भाजपने म्हटले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला आहे. संजय राठोड गायब आहेत कोणी सांगितलं? आजच माझं यशोमती ठाकूर, संजय राठोड, बच्चू कडू यांच्याशी फोनवरुन बोलणे झाल्याची माहिती पवार यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, पूजा चव्हाण प्रकरणी पोलिसांकडून जोरात चौकशी सुरु आहे. काही जणांना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती मिळत आहे. पोलिसांकडे चौकशी करण्यास सांगण्यात आलं आहे. आम्ही त्यात कोणतीही मध्यस्थी करत नाही. चौकशी जोरात सुरु आहे. त्यातून काय सत्य आहे ते बाहेर येईल. मी काही पोलिसांशी संपर्क साधला नाही. कारण नसताना आम्ही सारखं फोन करुन संपर्क साधला त्यात राजकीय हस्तक्षेप होतो, अशा गोष्टी बोलल्या जातात. त्यापेक्षा अतिशय निर्भीडपणे चौकशी करण्यासाठी आपण सांगितलेले आहे.