कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकासाचे ध्येय समोर ठेवून शिवसैनिक काम करणार आहेत.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्व, समाजकार्य विचारांवर शिवसेना चालत आहे. शिवसेनेच्या विविध पदांवर काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्हाकार्यकारणी उद्या (रविवार) रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

राजेश क्षीरसागर यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन घेवून आम्ही काम करीत आहोत. जिल्हा पातळीवर शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हाप्रमुख, महिला आघाडी जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख, महिला आघाडी शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख अशा विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

यातील शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरील नियुक्ती उद्या शिवालय, शिवसेना शहर कार्यालय, कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेद्वारे या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.