कुरुंदवाड येथे शनिवारी शिवसेना चैतन्य मेळावा

0
115

शिरोळ (प्रतिनिधी) : शिवसेना नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत भालचंद्र सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कुरुंदवाड येथे  शनिवारी (दि.२०) शिवसेना चैतन्य मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख वैभव उगळे यांनी आज (गुरूवार) पत्रकार परिषदेत दिले.  

यावेळी मंत्री सामंत यांच्या हस्ते तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि  शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी चैतन्य मेळाव्याचे आयोजन केल्याचे उगळे यांनी सांगितले.

या मेळाव्यास धैर्यशील माने (खासदार), उल्हास पाटील (माजी आमदार), अरूणभाई दुधवडकर (कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख), मुरलीधर जाधव (कोल्हापूर जिल्हा प्रमुख), मधुकर पाटील (उपजिल्हा प्रमुख), राजाराम सुतार (शिरोळ विधानसभा संपर्कप्रमुख) आदी उपस्थितीत राहणार आहेत. तरी या मेळाव्याला सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उगळे यांनी केले आहे.