महिला सबलीकरणासाठी शिवसेना-भगिनी मंच सदैव तत्पर : वैशाली क्षीरसागर

0
64

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिलांच्या सबलीकरणासाठी शिवसेना आणि भगिनी मंच नेहमीच एक पाऊल पुढे असतो. त्यामुळे येणाऱ्या काळातही लेक वाचवा, लेक शिकवा अभियानातून महिलांच्या सबलीकरणाचे कार्य अविरत सुरु ठेवणार आहे. महिला सबलीकरणासाठी शिवसेना आणि भगिनी मंच सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी केले. त्या महिला दिनानिमित्त आज (सोमवार) बोलत होत्या.

शिवसेना आणि भगिनी मंचच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यावेळी महिला भगिनींच्या वतीने लेक वाचवा लेक शिकवा, अभिमान मातेचा, सन्मान मुलींचा अशा आशयाचा संदेश भगव्या फुग्यांद्वारे आकाशात सोडण्यात आले.

वैशाली क्षीरसागर यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर महानगरपालिका प्रभाग क्र.२९ शिपुगडे तालीम, प्रभाग क्र.३० खोलखंडोबा, प्रभाग क्र.३१ बाजारगेट या प्रभागातील रहिवासी कुटुंबीयांमध्ये ८ मार्च ते ७ एप्रिल २०२१ दरम्यान मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या नावे ५ हजारांची ठेव पावती ठेवण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी केली.

यावेळी माजी महापौर सरिता मोरे,  नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, ज्योती हंकारे, दिशा क्षीरसागर, शिवसेना महिला आघाडी शहरसंघटक मंगल साळोखे, श्रीमती पूजाताई भोर, पूजा कामते, शाहीन काझी, गौरी माळदकर, अनुराधा परमणे, मीनाताई पोतदार यांच्यासह शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, भगिनी मंच सदस्या उपस्थित होत्या.