गारगोटी येथे शिव संघर्ष समितीच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलन…

0
268

गारगोटी (प्रतिनिधी) :  हिंदू धर्माविषयी वाईट उद्गार काढलेल्या देशद्रोही सर्जिल अस्मानच्या पुतळ्याला शिव संघर्ष समितीच्या वतीने गारगोटी तहसील कार्यालयासमोर आज (शुक्रवार) जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्जिल अस्मानच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.

हिंदू धर्म आमचा अभिमान आहे, आणि हिंदू धर्मा विषयी कोण वाईट बोलत असेल अशा व्यक्तीला आम्ही सोडणार नाही. त्याची योग्य ती जागा दाखवू, असे प्रतिपादन भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सिंह सावंत यांनी केले. या वेळी देशद्रोही सर्जील अस्मानी याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केला. तसेच छ. शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनायक परुळेकर, मनसे तालुका प्रमुख विक्रम आरडे, सुरेश पाटील, पार्थ सावंत, कृष्णा गोरे, सुनिल जाधव, दिलीप कदम, रमेश माने, संजय तानवडे, केदार गोरे, चंदू येसादे, वसंत चौगुले, हिंदू प्रेमी शिव संघर्ष समिती भुदरगडचे पदाधिकारी उपस्थित होते.