नारायण राणेंच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांचा राडा : पोलिसांचा लाठीचार्ज  

0
14

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे आज (मंगळवार) जोरदार आंदोलन करण्यात आले.  

यावेळी राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला.  युवासेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणे समर्थक आणि युवासैनिक समोर आल्याने मोठा गोंधळ उडाला. युवासेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला.

दरम्यान, नारायण राणे यांच्या निषेधार्थ मुंबईबरोबरच राज्यभरात तमाम शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. राणेंच्या प्रतीकात्मक  पुतळ्याचे दहन, रास्ता रोको, महामार्ग रोको अशा  माध्यमातून शिवसैनिक संताप व्यक्त करीत आहेत.