गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज नगरपालिकेच्या वतीने छ. शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी भव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. यामध्ये हत्ती,घोडे, बैल यांचा मोठा लवाजमा या मिरवणुकीसाठी असणार आहे.  तसेच या वेळी चित्ररथ स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे गडहिंग्लजमध्ये शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरी करणार असल्याचे नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सांगितले.

स्वाती कोरी म्हणाल्या की, या सोहळ्यासाठी प्रत्येक सहभागी चित्ररथाला पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व शाळा, महाविद्यालये,तरुण मंडळे,सामाजिक संस्था, बचत गट, तसेच गडहिंग्लजकरमधील सर्व नागरिकांचा सहभाग या लोकोत्सवात असणार आहे. या सोहळ्यासाठी शिवजयंती गडहिंग्लजकरांची ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून सोहळ्याचे संपूर्ण नियोजन सुरू असल्याचे नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच शासनाने दिलेल्या कोरोनासाठीचे सर्व नियम या सोहळ्यासाठी लागू असतील असेही कोरी यांनी सांगितले.