शाहू ग्रुपतर्फे शिवजयंती जल्लोषात

0
50

कागल (प्रतिनिधी) : येथील शाहू ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळी बसस्थानक परिसरातील महाराजांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे व वीरेंद्रसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जलाभिषेक करण्यात आला.

नगरपालिके समोरील आणि खर्डेकर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, आर्यवीर घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, श्रेयादेवी घाटगे यांच्यासह महिलांच्या गर्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुपारी १२ वाजता जन्मकाळ सोहळा झाला. महिलांनी पाळणा गायन केले. तसेच ऐतिहासिक श्रीराम मंदिर येथील सभागृहात हिदायत नायकवाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवगीते गायिले. शिवशाहीर धोंडीराम मगदूम वडगावकर यांनी पोवाडा, शिवगीते गियिले.

यावेळी शाहू साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, बॉबी माने, संजय पाटील, शाहूचे संचालक यशवंत माने, राजेंद्र जाधव, विशाल पाटील, दीपक मगर, प्रवीण कदम, आप्पासाहेब भोसले, प्रा. सुनील मगदूम, प्रवीण गुरव, विवेक कुलकर्णी, उमेश सावंत, धैर्यशील इंगळे, नगरसेविका विजया निंबाळकर, आनंदी मोकाशी, सुधा कदम, नम्रता कुलकर्णी, फरीदा बुखारी, अनुप्रिता इंगळे यांच्यासह शाहूग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.