पुलाची शिरोली ग्रा. पं. तर्फे दिव्यांगांना धनादेशाचे वाटप…

0
215

टोप (प्रतिनिधी) : हातकलंगले तालुक्यातील पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने शिरोली परिसरातील असनाऱ्या नोंदणीकृत २१६ दिव्यांग आहेत. सन २०२१ मधील ग्रामपंचायत राखीव निधीतील पाच टक्के रक्कम दिव्यांगांना प्रत्येकी १७०० चा धनादेश सरपंच शशिकांत खवरे यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी सरपंच खवरे म्हणाले की, मी ज्यावेळी सरपंच झालो त्यावेळी 3 टक्के अपंग कल्याण निधी होता. आज तो ५ टक्के झाला आहे. यावर्षी चार लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. यापुढेही सर्व दिव्यांगांचे  प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी उपसरपंच सुरेश यादव, माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण ग्रा.पं. सदस्य उर्मिला जाधव, अनिता कांबळे, संध्याराणी करणे, सूर्यकांत खटाळे, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. भोगण, लाभार्थी उपस्थित होते.