कोल्हापूर परिक्षेत्रात शिरोली पोलीस ठाणे ठरले उत्कृष्ट…

0
188

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापूर  परिक्षेत्रातील उत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेमध्ये शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली आहे. या निवडीने कोल्हापूर पोलीस दलाची मान उंचावली आहे. यामुळे  कोल्हापूर जिल्ह्याला उत्कृष्ट पोलीस ठाणे स्पर्धेमध्ये निवड होण्याचा बहुमान मिळालेला आहे.

पोलीस दलाच्या कामकाजात निकोप स्पर्धा वाढावी. तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध यामध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने देशपातळीवर सर्वोत्कृष्ट दहा पोलीस ठाण्याची  बेस्ट पोलीस स्टेशन निवड करण्यात येते. त्यासाठी  कोल्हापूर जिल्ह्यातून पोलीस कामकाजाचे मूल्यमापन करून जुना राजवाडा आणि शिरोली एमआयडीसी  पोलीस ठाण्यांची निवड करण्यात  येऊन  पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र,कोल्हापूर यांना माहिती सादर करण्यात आली होती.

कोल्हापूर  परिक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा सोलापूर ग्रामीण, आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यांचा  समावेश असून सुमारे दिडशे पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. यामध्ये  शिरोली एमआयडीसी  पोलीस ठाणे आणि करकंब  पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली आहे.

यासाठी पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर  पोलीस अधिक्षक  तिरुपती काकडे, करवीर विभागीय पोलीस अधिक्षक आर. आर. पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली   शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि. किरण भोसले आणि सर्व कर्मचाऱ्यांचे परिश्रम कामी आले.