टोप (प्रतिनिधी) :  शिरोली पोलिस ठाण्याचे ट्रॅफिक हवालदार शशिकांत मेतके यांना कर्तव्य बजावत असताना 33 हजारांची रोकड असलेले पाकीट सापडले आहे. तरी याची ओळख पटवून हे पाकीट घेवून जाण्याचे आवाहन शिरोली पोलिसांनी केले आहे.

शिरोली पोलिस ठाण्याचे ट्रॅफिक हवालदार शशिकांत मेतके यांना कोल्हापूरातील कळंबा ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम दरम्यान 33 हजार ५०५ रूपये असलेले पैशाचे पाकीट सापडले. मेतके यांनी हे पाकीट कोणाचे आहे याचा तपास केला. परंतु, पाकीटात कोणतेही ओळखपत्र नसल्याने याची माहिती मिळाली नाही. मेतके यांनी हे पाकीट शिरोली पोलिस ठाण्याचे सपोनि. राजेश खांडवे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी खांडवे यांनी ज्या व्यक्तिचे हे पाकीट आहे त्यांनी या पाकीटाची ओळख पटवून ते घेवून जावे असे आवाहन केले आहे. तर मेतके यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुकही केले आहे.