शिरोली, मौजे वडगाव ग्रामपंचायतीचा देशव्यापी बंदला पाठिंबा…

0
199

टोप (प्रतिनिधी) : माझा शेतकरी, माझा पाठिंबा शेतकरी यांच्यासाठी चाललेले देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरोली ग्रामपंचायत आणि मौजे वडगाव ग्रामपंचायतीने बैठक घेतली. यामध्ये दोन्ही गावांनी उद्या (मंगळवार) देशव्यापी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी शिरोली सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव, महेश चव्हाण, बाजीराव सातपुते, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, राजकुमार पाटील, मौजे वडगावचे सरपंच काशिनाथ कांबळे, किरण चौगुले,  मानसिंग रजपुत, उदय चौगुले, पोलीस पाटील आमिर हजारी, कार्यकर्ते उपस्थित होते.