शिरोळचा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार – ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

0
34

शिरोळ प्रतिनिधी (सुभाष गुरव) : शिरोळ नगरपरिषदेने नवीन विस्तारित नळ पाणीपुरवठ्या बाबतचा दिलेला प्रस्ताव आवश्यक त्या बाबी पूर्ण करून तातडीने सादर करावा असे आदेश पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळच्या प्रस्तावित नळपाणीपुरवठा योजनेसंदर्भात पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात बुधवारी बैठकीचे आयोजन केले होते.

बैठकीस शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील प्रमुख उपस्थित होते. झपाट्याने विस्तारित होत असलेल्या शिरोळ शहरासाठी अस्तित्वात असलेली नळ पाणीपुरवठा योजना योग्य दाबाने अथवा पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे विस्तारित नळपाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंजुरीसाठीचा प्रस्ताव शिरोळ नगरपरिषदेने सादर केला होता. बैठकीत या संबंधित चर्चा झाली, बैठकीस उपस्थित जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राहटे यांना सर्व बाबींची पूर्तता करून प्रस्ताव तातडीने सादर करण्या बाबतचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी दिले. बैठकीस शिरोळचे मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.