‘आंदोलन अंकुश’च्या शिरोळ तालुका बंदला संमिश्र प्रतिसाद

0
34

शिरोळ (प्रतिनिधी) : महावितरणने अन्यायकारकपणे वीजबिल वसुली सुरूच ठेवल्याच्या निषेधार्थ आज (सोमवार) ‘आंदोलन अंकुश’च्या वतीने शिरोळ तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

एरवी गजबजलेल्या बाजारपेठेसह गावांमध्ये सर्व व्यवहार बंद असल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता शिरोळमध्ये काही वेळ दुकाने बंद ठेवण्यात आली होती. नंतर मात्र ती उघडण्यात आली. शिरोळ तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय परिसरामध्ये फारशी गर्दी नव्हती.