शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल : गोऱ्हे

0
34

मुंबई (प्रतिनिधी) : जर एकनाथ शिंदेंचा गट कोणत्या पक्षात विलीन झाला नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. यामुळे एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव वापरता येणार नाही. शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल, असे नीलम गोऱ्हे यांनी घटनात्मक तरतुदीचा दाखला देत म्हटले आहे. हा राज्य घटनेच्या परिषिष्ठाप्रमाणे तो कायदा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मूळ पक्षाचे नाव हे शिंदे गटाला वापरता येत नाही. त्यामुळे ते सर्व आमदारांना प्रहार किंवा भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. महाराष्ट्रात गैरसमज पसरवला जात आहे की, शिवसेना नाव हे शिंदे गटाला मिळणार, यावर नीलम गोऱ्हे यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूक आयोगाचा जो नियम आहे. त्यावर निर्णय घेण्यात येईल. शिवसेनेची एक राज्यघटना आहे. त्यानुसार कायदेशीर प्रकिया पार पाडावी लागेल.

जर एकनाथ शिंदेंनी प्रहार किंवा भाजपमध्ये आपला गट विलीन केला, तर त्यांनी खांद्यावरून शिवसेनेचा भगवा उतरवला असे म्हणावे लागेल. असे म्हणत त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.