कोल्हापूर महापालिकेच्या तिसऱ्या उपायुक्तपदी शिल्पा दरेकर…

0
155

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्त पदी शिल्पा दरेकर यांची नियुक्ती झाली आहे. दरेकर यांच्यासह महापालिकेला तीन उपायुक्त मिळाले आहेत.

महापालिकेला तीन उपायुक्त पदे मंजूर असून यातील दोन पदे रिक्त होती. तर निखिल मोरे हे उपायुक्त पदी राज्यशासनाकडून निवड झाली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेचे मावळते उप मुख्य कार्यकारी रविकांत आडसूळ यांची उपायुक्त पदावर निवड झाली. तर आज शिल्पा दरेकर या उपायुक्त पदावर रुजू झाल्या. दरेकर यांनी याआधी सांगली,अहमदनगर, जळगाव जिल्ह्यात काम केले आहे.