कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी शिक्षक बँक निवडणुकीत शिक्षक समिती स्वबळावर लढणार असून यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सांगत मागील निवडणुतील युतीचा अनुभव पाहता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा वज्रनिर्धार समितीचे राज्य नेते शंकर मनवाडकर (चंदगड) यांनी केला. जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमध्ये समितीच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी समितीकडून कर्तबगार व स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार उभा केले जातील. यावेळी सर्व पॅनल विजयी करून मागील निवडणुकीतील झालेला पराभव धुवून काढला जाईल.

यावेळी शिक्षक नेते कृष्णात कारंडे, बाळासाहेब पोवार, रवळू पाटील, बळवंत शिंत्रे, बँक संचालक सुरेश कोळी, डी.जी. पाटील, राज्य ऑडिटर राजेंद्र पाटील, राज्य महिला आघाडी अध्यक्षा वर्षा केनवडे, विठ्ठल भाट, राज्य संघटक सतीश बरगे, राज्य प्रसिद्धी प्रमुख हरिदास वर्णे, राज्य सदस्य सतीश तेली, मधुकर मुसळे, जि.प. कर्मचारी चेअरमन राजीव परीट, बाजीराव पाटील, मारुती पाटील, गोविंद पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा दिपाली भोईटे, प्रमोद भांदिगरे, शरद केनवडे, गणपती मांडवकर, आदीसह तालुका प्रतिनिधी व शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक सरचिटणीस प्रमोद तौदकर यांनी केले.