मुंबई (प्रतिनिधी) : अश्लील फिल्म, मालिका बनविल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींची चौकशी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मॉडेल शर्लिन चोप्राला चौकशीसाठी क्राइम ब्रँचने बोलावले होते. आता शर्लिन चोप्राने सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केलाय ज्यामुळे खळबळ माजली आहे.

शर्लिन चोप्राने राज कुंद्रासोबतचा एक फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. हा फोटो ‘द शर्लिन चोप्रा’ अ‍ॅपच्या पहिल्या शूटिंगवेळीचा असल्याचा दावा तिने केलाय. त्यात तिने म्हटलंय, “२९ मार्च २०१९ चा दिवस, आर्म्स प्राइम आयोजित ‘द शर्लिन चोप्रा’ अ‍ॅपच्या पहिल्या कंटेंटचं शूटिंग सुरु होणार होतं. माझ्यासाठी नवा अनुभव होता, कारण यापूर्वी कधी अशा अ‍ॅपसोबत काम केलं नव्हतं. या वेळी खूप उत्साहाचं वातावरण होतं. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एका वृत्तसंस्थेला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्लिन चोप्राने सांगितले की, राज कुंद्राने आपल्याशी संपर्क साधला असून आपण करारही केला आहे. राज कुंद्रा अ‍ॅपमध्ये फॅशन, फिटनेस आणि ग्लॅमरस व्हिडिओ अपलोड करणार होता. सुरुवातीला यात ग्लॅमरस व्हिडीओ होते, मात्र कालांतराने ते सेमी न्यूड आणि नंतर न्यूड होत गेले.