जयंत पाटलांच्या ‘त्या’ इच्छेवर शरद पवारांची सूचक प्रतिक्रिया  

0
235

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते, या इच्छेवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात मिश्किल प्रतिक्रीया दिली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर पवार म्हणाले की, मग त्यात काय झाले. इच्छा व्यक्त करण्याचा सर्वाना अधिकार आहे. त्यांना शुभेच्छा, उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावे, कोणी करणार का? असे सांगत एक सुचक इशारही पवार यांनी दिला.

मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, अशी सुप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. तसेच दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कुणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते, मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, पण शरद पवारांचा निर्णय हा आमच्या दृष्टीने अंतिम आहे. राजकीय वर्तुळातील चर्चेनंतर मी असे म्हटलेच नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी यूटर्नही घेतला. मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न मला विचारण्यात आला होता.