माढ्यातून माघार घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये : चंद्रकांत पाटील  

0
65

सांगली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवार यांनी मला शिकवू नये, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होत्या.

ज्यांना आपले स्वत:चे गाव सोडून राहण्यासाठी अन्य गावी जावे लागते, अशा लोकांबद्दल मी बोलायचे का, असा टोला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. यावर पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला गाव सोडून जावे लागते, असे शरद पवार बोलले. पवारांना माढामधून लढावे लागले. मात्र, पराभूत होतील म्हणून त्यांना माढा सोडावा लागला. पक्षा पेक्षा त्यांनी स्वत:चा विचार केला. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप होत आहेत. पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?, असे पाटील यांनी म्हटले आहे.