पुणे (प्रतिनिधी) : देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असल्याने मी न्याय मागायला कोणत्याही कोर्टात जाणार नाही,  हे माजी सरन्यायाधीशांचे वक्तव्य धक्कादायक असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले. तसेच माजी सरन्यायाधीश रंजन गोगईच जर असे वक्तव्य करणार असतील तर सामान्यांनी काय करायचे असा सवालही त्यांनी केला.

पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी न्यायाधीशांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील न्यायव्यवस्था उच्च आहे, असे मत व्यक्त केले होते. ते माझ्या वाचनात आले होते. त्यावेळी आनंद झाला होता. पण गोगाई म्हणतात की न्यायालयांमध्ये न्याय मिळत नाही. हे त्याचे विधान धक्कादायक आहे. त्यांनी न्याय व्यवस्थेबाबत त्यांच्या परीने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे की अन्य काही सुचवायचे आहे. हे मला माहीत नाही. पण त्यांचे विधान प्रत्येकाला चिंता करायला लावणार आहे.