शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत : अनंत गीते

0
43
The Union Minister for Heavy Industries and Public Enterprises, Shri Anant Geete addressing the gathering, on the occasion of the Public Sector Day, in New Delhi on April 11, 2017.

रायगड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. त्यामुळे शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच, अशा शब्दांत शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. श्रीवर्धनमध्ये आयोजित शिवसेनेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केल्याने रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे असा जुना संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.

यावेळी गीते म्हणाले की, काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही. तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे, असेही गीते यावेळी म्हणाले.