मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि बांगलादेश यांच्यात उद्यापासून एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. या मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. बीसीसीआयने त्याच्या जागी संघात वेगवान गोलंदाज उम्रान मलिक याचा समावेश केल्याची माहिती बीसीसीआयने शनिवारी सकाळी दिली.

बीसीसीआयने पत्रकाद्वारे सांगितले की, बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेआधी मोहम्मद शमीच्या खांद्याला दुखापत झाली होती. सध्या तो एनसीए, बेंगळुरूत बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली तो आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही. अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने उम्रान मलिकची शमीच्या जागी संघात निवड केली आहे.