पुणे (प्रतिनिधी) : तुम्हाला उमेदवारी देऊ का ? अशी थेट ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाराला दिली.  विधान परिषदेच्या जागेवरून अनेक नावे पुढे येत आहे. मात्र, राज्यपाल हे तेथील खुर्चीत बसून भाजपाची भूमिका मांडत आहे. यावरून सोशल मीडियावरून चर्चा रंगली आहे. या पत्रकाराच्या प्रश्नावर  पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज्यपालपदाची एक गरिमा असते ती राखली गेली पाहिजे. राज्यपाल भाजपला झुकतं माप देतात, अशी चर्चा करणारे ती गरीमा राखत नाहीत, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच याबाबत मी बोलणार नाही, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षण, राज्यातील इतर विषय यावर सरकार अभ्यास करत नाही,  कोणाचाही सल्ला घेत नाही. ‘हम करे सो’ कायदा हे असे या ठाकरे सरकारचे धोरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडायला तयार नाहीत, अशीही टीका त्यांनी केली.