गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास शाहूपुरी पोलिसांनी केली अटक

0
94

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या शाहूपुरी पोलिसांनी मार्केट यार्डाजवळ अटक केली. अनिल बाबूराव तावडे (वय ४०, रा. सरवडे, ता. राधानगरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल एक जिवंत राऊंड जप्त केला आहे.

कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात एक इसम गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास या परिसरात सापळा रचला होता. त्या वेळी तावडे हा पोलिसांना आढळून आला. तपासणीअंती त्याच्याकडे ६० हजारांचे गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. अनिल तावडे याला अटक करण्यात आली आहे.