शाहूपुरीतील घरफोडीचा डी. बी. पथकाने आठच दिवसांत लावला छडा : संशयितास अटक  

0
91

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूपुरीतील पहिल्या गल्लीत १३ जून रोजी घरफोडी होऊन सुमारे दीड लाखांची रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी सुधीर धोंडोपंत कितेणे (वय ७७, रा. ई वॉर्ड, शाहूपुरी पहिली गल्ली) यांनी फिर्याद दिली होती. अवघ्या आठ दिवसांत शाहूपुरी पोलीस ठाण्यातील डी.बी.पथकाने याचा छडा लावून एका सराईत गुन्हेगारास अटक केली. दिग्विजय अनिल जाधव (वय २३, रा. डोंगळे अपार्टमेंट शेजारी, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

या प्रकरणाचा तपास करताना शाहूपुरी ठाण्यातील डी. बी. पथकातील पो. कॉ. सागर माने यांना हा गुन्हा जाधव याने केल्याची खबर मिळाली. त्यानुसार सपोनि कोरके यांनी पथकातील सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयिताकडून चोरीच्या दीड लाख रकमेपैकी एक लाख ३२ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई सपोनि कोरके, पोलीस नाईक धर्मेंद्र बगाडे, जगदीश बामणीकर, काँ. सागर माने, शुभम संकपाळ, यांनी केली.