कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् को-ऑपरेटिव्ह बँकेने पारदर्शक  कारभाराद्वारे ठेवींचा चढता आलेख कायम ठेवला आहे. बँकेने सलग १० वर्षे शून्य टक्के एनपीए ठेवून सुमारे २ कोटी १ लाखांचा विक्रमी नफा मिळविलेला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रविंद्र पंदारे यांनी दिली. बँकेची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (शनिवार) ऑनलाईन पध्दतीने पार पडली.

पंदारे म्हणाले की, सभासद आणि ग्राहकांसाठी एसएमएस बँकींग सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर भविष्यात मोबाईल बँकींग, नेट बँकींग सुरू करण्याचा मानस आहे. कर्जावरील व्याजदर ९.९० टक्के इतका करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व सहकारी बँकांमध्ये सर्वात कमी व्याजदर आकारणारी आपली एकमेव बँक ठरली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी उपाध्यक्ष विलासराव कुरणे, संचालक मधुकर पाटील, शशिकांत तिवले, प्रकाश पाटील, राजेंद्र चव्हाण, भरत पाटील, अतुल जाधव, राजेंद्र पाटील, रमेश घाटगे, संजय सुतार, जयदीप कांबळे, संचालिका हेमा पाटील, नेहा कापरे, मुख्य लेखापाल रूपेश पाटोळे आदीसह कर्मचारी, सभासद उपस्थित होते. विलासराव कुरणे यांनी आभार मानले.