कागल (प्रतिनिधी) :  यावर्षी महापुरामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः नदी काठाशेजारील ऊस पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस बुडाल्यामुळे या पिकांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चालू गळीत हंगामात शाहू साखर कारखाना अशा  पूरबाधित भागातील ऊस अग्रक्रमाने तोडणार असून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. अशी घोषणा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केली.

यावेळी कारखान्यामार्फत गळीत हंगाम 2019- 20  आणि 2020- 21 या दोन हंगामामध्ये घेतलेल्या ऊस पीक स्पर्धा आणि छ. शाहू शाश्वत ऊस उत्पादन वाढ या योजनेअंतर्गत विजेत्या ऊस उत्पादक स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन घेतलेल्या   ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना घाटगे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यावेळी व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी उर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.