शाहू जन्मस्थान आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे : खा. सुप्रिया सुळे

0
176

कसबा बावडा (प्रतिनिधी)  : छत्रपती शिवरायानंतर राजर्षी शाहू महाराजांनी द्रष्टेपणाने व्हिजन ठेऊन केलेले काम खूप मोठे आहे. त्यामुळे शाहूंचे जन्मस्थान आंतरराष्ट्रीय स्तराचे झाले पाहिजे,  असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (शुक्रवार) येथे केले. शाहू जन्मस्थळाला भेट दिल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी सुळे म्हणाल्या की, शाहू जन्मस्थानाबाबत लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी बोलून मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल.   शाहू जन्मस्थळी बसवलेल्या फरशीबाबत नाराजी व्यक्त करून जन्मस्थळाला साजेसे काम झाले नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना आराखडा सादर करण्याचा सूचना दिल्या.

यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत,  डॉ मंजुश्री पवार,  लेखिका प्रज्ञा पवार, मराठा महासंघाचे वसंत मुळीक,  नाविद मुश्रीफ,  आदिल फरास,  युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, उपाध्यक्ष राकेश कामटे, माजी नगरसेवक अशोक जाधव, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील,  रामराजे बदाले, पुरातत्व खात्याचे उदय सुर्वे,  उत्तम कांबळे,  अवधूत पाटील, अभिजित जाधव  आदी उपस्थित होते.