मुंबई (प्रतिनिधी) :  मुंबई क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करत सेक्स टुरिझमचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने दोन महिला दलालांना अटक केली आहे. तर दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या आरोपी महिला दोन तरुणींना घेऊन मुंबई विमानतळावर  येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

सेक्स टुरिझमही ही टोळी सर्वप्रथम ग्राहक शोधत असते. जर ग्राहक मिळाला तर त्यानंतर बोलणी करुन अंतिम डील फायनल केली जात होती. यानंतर ही टोळी तरुणींना ग्राहकांसोबत संपूर्ण भारतभर फिरण्यासाठी पाठवत असे. भारतातील विविध पर्यटनस्थळांवर फिरण्यासाठी त्यांना पाठवण्यात येत होते. गोवा हे त्यांचे आवडते ठिकाण होते. यावेळी ग्राहकांसोबत देह व्यापार केला जात असल्याचे पोलीसांनी सांगितले.

सर्वप्रथम मुलींचे फोटो ग्राहकांना पाठवण्यात येत होते. ग्राहकांना मुलींचा फोटो आवडल्यानंतर गोवा किंवा इतर ठिकाणावर जाण्यासाठी फ्लाईट तिकिट स्वत: बुक करावी लागत असे. ग्राहकांकडून ही टोळी दोन दिवसांसाठी ५० हजार रुपये घेत असे. तर या दलाल महिला त्या मुलींकडून २० टक्के कमिशन घेत असे. यानंतर मुलींसोबत ग्राहकाला दोन दिवस फिरण्यासाठी गोवा किंवा अन्य ठिकाणी पाठवले जात असे. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा हे मुंबईला येत असल्याचे सांगण्यात आले.