इचलकरंजी (प्रतिनिधी): शहर आणि परिसरातील रासायनिक प्रक्रिया केलेले व मैलायुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. यामुळे प्रदूषणामुळे पंचगंगा नदी आता जलपर्णी वाढली आहे. परिणामी जलचर प्राणी व पोहण्यास येणाऱ्या नागरिकांना मोठा धोका पोहचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नदी प्रवाहित करुन जलपर्णी हटवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

इचलकरंजी शहरास पंचगंगा व कृष्णा नदीतून पाणी पुरवठा होतो. पण पंचगंगा नदी प्रदूषित होवून अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झाला आहे. हे संकट कायम असतानाच आता पुन्हा एकदा इचलकरंजीतील पंचगंगा नदी घाट परिसरात जलपर्णी मोठ्या प्रमाणात व्यापली आहे. नदीचे दोन्ही पात्र जलपर्णीने व्यापून नदीतील पाण्याला हिरवट रंग आला आहे. पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. यामुळे पंचगंगेतून शहरासाठी पाणी उपसा करणे आरोग्याच्या दृष्टीने जोखमीचे ठरत आहे.